सांगली (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांना सहकार भूषण आणि उद्योजक मनोहर सारडा यांना उद्योग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कर्मवीर पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, सांगली येथील प्रतिष्ठा न्यूजतर्फे रावसाहेब पाटील यांना सहकार भूषण पुरस्कार तर मनोहर सारडा यांना उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर कर्मवीर पतसंस्थेच्यावतीने त्यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोहर सारडा म्हणाले, कर्मवीर पतसंस्था ही एक आदर्श पतसंस्था आहे. या ही संस्था नजीकच्या काळात 2000 कोटी ठेवीचे उद्देश पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी मला मिळालेला सहकार भूषण पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेमुळे मिळाला आहे त्यामुळे हा पुरस्कार मी कर्मवीर पतसंस्थेलाच देत आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी एस. पी. मगदूम यांनी मनोहर सारडा तर रावसाहेब पाटील यांचा डॉ. अशोक सकळे यांनी सत्कार केला. यावेळी डॉ. रमेश ढबू वसंतराव नवले, ए के नाना चौगुले, डॉ नरेंद्र खाडे, श्रीमती भारती चोपडे, लालासो थोटे, डॉ मोटके पाटील, डॉ चेतन पाटील, जिव्हाळा ग्रुपचे आर बी पाटील, लक्ष्मण नवलाई, विजय तेली, प्रमोद लाड, शितल पाटील, रमाकांत घोडके, सुतार साहेब सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.