आष्टयात शिवप्रेमींचे स्वप्न साकार होणार; कामाचा शुभारंभ


आष्टा : (डॉ तानाजी टकले ) आष्टा येथील बहुचर्चित नियोजित छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा दगडी कपौंड बांधकाम सुरू करण्यात आले. यासाठी शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांनी शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत अकरा लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांनी दिली.


वीर कुदळे म्हणाले, आष्टा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासनाची सर्व्हे क्रं. १०७५ मधील १५४ चौरसमीटर जागा आष्टा नगरपालिकेकडे हस्तांतरीत होऊन त्याठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभरापूर्वी पुतळा संघर्ष समिती व शिवभक्ताच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी २०२३ च्या दरम्यान हा भूखंड रितसर शासकिय मोजणी करून मंजूर नकाशा तयार करून नगरपालिकेकडे हस्तांतरीत केला. सध्या हा भूखंड आष्टा नगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात बगीचासाठी आरक्षित आहे. याच‌ बगीच्यात छत्रपती शिवरायांचा आश्वारूढ पुतळा भव्य चबुतरा करून उभा करण्यात येणार
आहे.

शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांनी नियोजीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेमध्ये दगडी कपौंड बांधण्यासाठी अकरा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आज सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम सुरू करण्यात आले. महिनाभरात याचा लोकार्पण सोहळा खासदार धैर्यशिल माने यांच्या हस्ते होणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून बगीच्यासाठी दहा लाखाचा निधी मंजुर असून त्याचे लवकरच काम सुरू होणार आहे.
आष्टा शहरात नियोजीत छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या जागेत दगडी कंपौडचे काम युध्दपातळीवर सुरू झाल्याने शहरातील शिवभक्तामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अश्वारूढ पुतळ्याची लवकरच स्वप्नपूर्ती होणार असल्याच्या
भावना शिवभक्तामध्ये आहेत .

यावेळी तालुका उपप्रमुख दिलीप कुरणे, माजी नगरसेवक अमोल पडळकर, सुरज उंडाळे, संजय कोटीवाणी, अशोक जाधव, हेमंत पवार, राहूल हिरुगडे, रवि इंगळे, महादेव कोळी, संभाजी माळी व शिवभक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *