विटा (प्रतिनिधी) : स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. त्यांच्या आकस्मित जाण्याने आपण सावरू शकलो नाही. मात्र त्यांच्या पश्चात सुहास बाबर यांना निवडून आणणे ही जनतेची व आपली जबाबदारी आहे, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी व्यक्त केले.
भिवघाट येथे खानापूर मतदारसंघातील महत्त्वपूर्ण अशा टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात वंचित गावांचा समावेश केल्याबद्दल व खानापूर मतदारसंघांमध्ये विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणल्याबद्दल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
घाटमाथ्याचे नेते राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे, शशिकांत शिंदे, अस्लम मुजावर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी सुहास बाबर म्हणाले, स्वर्गीय भाऊंचे आशीर्वाद व मतदार संघातील जनतेच्या पाठिंबावर आगामी विधानसभा निवडणुकीत आपणाला भरघोस यश मिळेल. अशी मला खात्री आहे. मी अनिलभाऊंच्या विचारांचा वारसदार असून, त्यांनी ज्या समर्पक भावनेने मतदारसंघात आयुष्यभर काम केले. त्याच भावनेने मी ही काम करणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.
स्वागत श्री राजाभाऊ शिंदे यांनी केले. प्रास्ताविक श्री सूर्याजी पाटील यांनी केले. आभार डॉ बाजीराव जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी घाटमाथ्यावरील विविध गावचे सरपंच व नेते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुहासनाना शिंदे, बाळासाहेब शिंदे. दादासो पाटील, सदाशिव हसवे, सिद्धेश्वर गायकवाड, रोहन जाधव, डॉ. बाजीराव जाधव, सुर्याजी पाटील, राजेंद्र शिंदे, जगदीश टिंगरे, दीपक माने आदी उपस्थित होते