सांगली / प्रतिनिधी
सांगलीतील सर्वाधिक प्रतिष्ठित, प्रीमियम लोकेशन असलेल्या विश्रामबागमध्ये ‘इवारा इस्टेट’ हा भव्य प्रकल्प साकारत आहे. अभिनव डिझाईन संकल्पना आणि वेल कनेक्टेड लोकेशन असा दुर्मिळ योग या प्रकल्पात जुळून आला आहे. चोखंदळ ग्राहकांना जागतिक दर्जाचे घर निवडल्याचे समाधान यामुळे मिळणार आहे. सूर्यवंशी कन्स्ट्रक्शन्स आणि दांडेकर ब्रदर्स यांच्या अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्पातील ‘ग्रेसिया’ या पहिल्या टॉवरचा शुभारंभ आज शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी होत असल्याची माहिती इवारा इस्टेटचे प्रवर्तक दिपक सुर्यवंशी व शेखर दांडेकर यांनी सांगितले.
उच्चभ्रू जीवनशैलीची आकांक्षा असलेल्या प्रतिष्ठित कुटुंबासाठी सुयोग्य प्रकल्प म्हणजे इवारा इस्टेट. इवाराचा अर्थ ‘दैवी देणगी’. त्या उत्कट भावनेचे पुरेपूर प्रतिबिंब या प्रकल्पात उमटलेले आहे. दोन एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या सांगलीतील सर्वाधिक उंच अशा ग्रेसिया, प्रोस्पेरिया आणि सेरेनिया या तीन १५ मजली टॉवर्समध्ये ४ आणि ५ बीएचके स्काय व्हिलाज, ४ आणि ५ बीएचके गार्डन डुप्लेक्सेस आणि कस्टमाईझेबल २ आणि ३ बीएचके प्रीमियम अपार्टमेंटस् आहेत.
सुविधांची रेलचेल..
लक्झुरियस सुविधांनी आणि दर्जेदार स्पेसिफिकेशन्सनी नटलेल्या इवारा इस्टेट या प्रकल्पात अप्रतिम ‘क्लब लाइफ’ चा अनुभव इथल्या रहिवाशांना मिळणार आहे. करमणूक, रिलॅक्सेशन, फिटनेस आणि सहजीवनासाठी इथे, क्लब हाऊस, बँक्वेट हॉल, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, बास्केटबॉल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रेन्स प्ले एरिया, लॉन, इनडोअर गेम्स यासह विविध आकर्षक सुविधांची रेलचेल आहे. खोल्यांची उंची जास्त असल्यामुळे व एल टाईप विंडोजमुळे अत्यंत हवेशीर भरपूर सूर्यप्रकाश असे मोकळे व रीफ्रेशिंग वातावरण प्रत्येक अपार्टमेंट मध्ये आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व पश्चिम दिशांना अनुसरून टॉवर्स उभारलेले असल्यामुळे हवा खेळती राहते.
इवारा इस्टेट ही न भूतो न भविष्यती अशी ही सांगलीमधील अद्वितीय निर्मिती आहे. सर्वोत्तम तेच निवडणाऱ्या कुटुंबांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. हा प्रकल्प चोखंदळ ग्राहकांना नक्की आनंद देईल. जागतिक दर्जाचे घर निवडल्याचे समाधान त्यांना मिळेल. अशीच सर्वोत्कृष्ट निर्मिती सातत्याने करण्यासाठी आम्ही यापुढेही कटिबद्ध असल्याचे दिपक सूर्यवंशी आणि शेखर दांडेकर यांनी सांगितले.
आनंद, आरोग्य..जागतिक जीवनशैलीचा फिल :
इवारा इस्टेट या भव्य प्रकल्पात प्रत्येक टॉवरमध्ये ‘ ग्राऊंड प्लस वन डुप्लेक्स पार्किंग’ असणार आहे. आनंद व आरोग्य या दोन्हीचा मिलाफ असलेली इथली जागतिक दर्जाची जीवनशैली संपूर्ण कुटुंबासाठी व कुटुंबातल्या प्रत्येकासाठी अगदी आदर्श आहे. भव्य एंट्रन्स, मल्टीलेव्हल सिक्युरिटी, दिमाखदार लॉबीज ही या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आहेत. अपार्टमेंटमध्येच बंगल्याचा सर्वांगीण अनुभव मिळणार आहे. संपूर्ण निर्मितीसाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर केल्याने गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड या प्रकल्पात नाही. समृध्द, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सांगली शहरात चोखंदळ ग्राहकांसाठी हा गृहप्रकल्प साकारला जात आहे.