विट्याचे आयाज मुल्ला शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी

आयाज मुल्ला यांची शिवसेना अल्पसंख्यांक कार्यक्षेत्र सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना युवा नेते सुहास बाबर.

सांगली (प्रतिनिधी) : येथील आयाज मुल्ला यांची शिवसेना अल्पसंख्यांक कार्यक्षेत्र सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आयाज मुल्ला हे खानापूर तालुक्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.

आयाज मुल्ला यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना अल्पसंख्यांक कार्यक्षेत्र सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल  सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक अमोलदादा बाबर, अमर शितोळे, रणजित पाटील, प्रकाश बागल, धनाजी कदम, अण्णा महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *