विटा ( प्रतिनिधी ) : टेंभू योजना सोडली तर विरोधकांकडे एकही मुद्दा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी उरलेला नाही. मात्र नवनवीन उद्योगधंदे आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आम्ही मतदार संघाचा चौफेर विकास करण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. गावोगावी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून यंदा निश्चितपणे परिवर्तन होईल असा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांनी व्यक्त केला.
खानापूर मतदारसंघातील कार्वे चिंचणी, मंगरूळ, बामणी, कुर्ली, घाडगेवाडी, पारे, घोटी या गावांमधील सभांमध्ये वैभव पाटील यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. यावेळी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कार्यकाळात या मतदारसंघात कशा पद्धतीने विकास साधण्यात आला हे सांगितले. तसेच गेल्या दहा वर्षात टेंभू योजना सोडली तर अन्य उद्योगधंदे, रोजगार, नोकरी या सर्वच क्षेत्राला खीळ बसल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले.
यावेळी सत्यवान माने, संतोष जाधव, शिवा पाटील, यांच्यासह विविध गावचे सरपंच उपसंपर्क कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.