खानापूर मतदारसंघात भाजप ‘ स्पॉन्सर ‘ उमेदवार; जयंतरावांचे राजेंद्रअण्णांवर टीकास्त्र


विटा ( प्रतिनिधी ) :  भाजपने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना स्पॉन्सर करून बंडखो-या करायला लावल्या आहेत. पण आटपाडीच्या साखर कारखान्याचे धुराडे आम्हीच पेटवणार, कुणी कसे वागायचे तसे वागा, असे सांगत अपक्ष उमेदवार राजेंद्र देशमुख आणि महायुतीवर टीका केली. तसेच खानापूर आटपाडीच्या विकासासाठी कर्तृत्ववान वैभव  पाटील हा नवा चेहरा दिला आहे. सर्व जनतेने त्याच्या पाठीशी ताकद उभी करा, असे प्रतिपादन माजी मंत्री जयंत पाटील यांनी केले.

खानापूर  येथे महाविकास आघाडीचे उमेदवार  वैभव पाटील त्यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  सांगली जिल्हा राष्ट्रवादी कार्याध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुळीक, माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील, वैभव पाटील पक्षनिरीक्षक हायमू सावनुरकर, देवराज पाटील, अरुण माने, आटपाडीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, किसन जानकर उपस्थित होते.

जयंत पाटील, म्हणाले खानापूर आटपाडी मधील शेतकऱ्यांसाठी 2019 – 20 मध्ये मी मंत्री असताना सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली आहे. आगामी काळात देखील या मतदार संघासाठी आम्ही पूर्ण ताकतीने काम करणार आहोत. खानापूर मतदारसंघातील सर्व जनतेने वैभव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभा करावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

जयंतराव पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीर केली, कुटुंब रक्षण योजनेत 25 लाख ₹ पर्यंत आरोग्य विमा, मुली महिलांसाठी मोफत बस सेवा,  युवकांना प्रतिमहीना 4000 रुपये, महिलांसाठी महालक्ष्मी योजना. प्रतिमहिना 3000 हजार देणार आणि
राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांत पर्यंत चे कर्ज माफ करण्यात येणार आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हैसाळ, टेंभू या जलसिंचन योजनासाठी मी मंत्री असताना 14 टीएमसी पाणी उपलब्ध करून सांगली जिल्ह्यातील 109 गावांना  देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यातील एखाद- दुसरे गाव अभावाने  राहील.

शिवाजी विद्यापीठाचे खानापूरला उपकेंद्र करण्यासाठी वैभव  पाटील यांच्या पाठीशी ठामपणे रहा . महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात खानापूरच्या उपकेंद्राचे रखडलेले मंजुरीचे काम पूर्ण झालेले असेल हा माझा शब्द आहे.

यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील म्हणाले, वैभव पाटील यांना मिळालेली उमेदवारी वारसा हक्कावर नसून त्यांच्या कर्तृत्वावर मिळालेली आहे. त्यांनी देशपातळीवरती स्वच्छतेमध्ये नगरपालिकेचा देशात प्रथम क्रमांक मिळवला. विट्याचा केलेला विकास आणि संस्थात्मक विकास करून तरुणांच्या हाताला काम, बेरोजगारीचा थोडाफार प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आणि मतदारसंघाचा चौफेर विकास साधण्याची दूरदृष्टी आणि धडपड यामुळेच त्यांच्या कर्तृत्वावर उमेदवारी मिळाली आहे. आता तुमची सर्व जनतेची जबाबदारी वाढते. जनतेने आता सावध राहणे गरजेचे आहे. मला फक्त खोक्यांचा धोका वाटतो. दोन पिढ्यांची तजवीज करून ठेवलेली आहे.

मी माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये  मतदारसंघाचा सर्वांगीण समतोल विकास करण्याचा प्रयत्न केला. आता ही धुरा वैभव  पाटील यांच्याकडे आपण सुपूर्द करायचे आहे. आपलं महाविकास आघाडीचे तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवायचा आहे आणि वैभव दादा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचा आहे.

यावेळी आटपाडीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, हणमंतराव देशमुख, संतोष जाधव, , मानसिंग भगत,माणिक भगत, महादेव साळुंखे पारे, तेजस्विनी पांचाळ यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला देवराज पाटील, अरुण माने, सचिन शिंदे, पृथ्वीराज पाटील, किसन जानकर, राजुशेठ जानकर, सौ अनिता पाटील, सुवर्णाताई पाटील, विष्णुपंत पाटील,रघुनाथ पवार, चंद्रकांत पवार, अधिकराव हसबे, काका शेठ हसबे,प्रकाश गायकवाड,अजित जाधव, संजय मोहिते डॉ. विजय मुळीक, पिंटू शेठ जाधव, गोपीनाथ सूर्यवंशी, मारुती भगत,तानाजी पाटील, श्रीरंग शिंदे उपस्थित होते.

खानापूर : महाविकास आघाडीचे  उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना माजी मंत्री जयंतराव पाटील व सदाशिवराव पाटील वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक व अन्य.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *