विटा ( प्रतिनिधी ) : खानापूर पूर्व भागातून ग्रीन कॉरिडोर हा नवीन हायवे हायवे जाणार आहे. तसेच या भागात नवीन उद्योगधंदे, शैक्षणिक संस्था आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू होणार असल्याने या भागाचे नंदनवन करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांनी केले.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी रेणावी, रेवनगाव , धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखिनवाडी,जाधववाडी या भागातून त्यांचा दौरा सुरू असताना त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी रेणावीचे ग्रामपंचायत सदस्य संजय यादव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्या दिवशी शरदचंद्र पवार साहेबांनी महाविकास आघाडीची वैभव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी वैभव पाटील यांचा विजय निश्चित झाला आहे. विरोधकांनी समाजासाठी कोणती विधायक काम केली ? किती रोजगार निर्मिती केली? शेत मालासाठी कोणते ठोस कार्य केले ? याबाबत काही बोलत नाहीत.
उलट वैभव पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या सर्व संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत वैभव पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येथील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वैभव पाटील यांच्या या संवाद दौऱ्याला संपूर्ण खानापूर मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.