विजेच्या स्पार्किंगमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी

आमदार सुहास बाबर यांची विधिमंडळात मागणी

विटा; प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळीत होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार सुहास बाबर यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली
आमदार बाबर म्हणाले, हा प्रश्न केवळ माझ्याच मतदारसंघापुरता मर्यादित नाही तरीही माझ्या मतदार संघाचा विचार करता महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे माझ्या खानापूर मतदारसंघातील सन २०१८-१९ पासून पीक जळीत झालेली ३७८ प्रस्ताव आहेत. त्यापैकी फक्त १३ प्रस्तावांना नुकसान भरपाई मिळाली आहे. सदर नुकसान भरपाई देण्याचे अधिकार गेल्या ५-६ वर्षांपासून प्रादेशिक संचालकास आहेत. परंतु त्रुटी पूर्तता व वेळकाढूपणामुळे प्रस्ताव प्रलंबित राहतात. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार मंडळ कार्यालयातील अधीक्षक अभियंता यांना द्यावेत व खानापूर मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव लवकर मंजूर करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली.


अनपेक्षित वादळी पावसामुळे आणि अवकाळी आणि वादळी वार यामुळे वीज वाहिन्यांचे पार्किंग होऊन जळीत झाल्याने नुकसान झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. त्यांची नुकसान भरपाई वेळेत मिळाली तर परस्थितीतून सावरण्यासाठी आपत्तीग्रस्ताना दिलासा मिळतो. परंतु या प्रक्रियेत काही प्रशासकीय अडचणीमुळे दिरंगाई होत असते. म्हणुन माझ्या मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करून नुकसान भरपाई द्यावेत. यावेळी आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथील शेतकऱ्याचा सन २०२१ मध्ये ऊस जळाला होता त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही परंतु गेल्या १५ दिवसापूर्वी त्यांचा परत ऊस जळाला आहे असे दाखले देऊन आपण शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सभागृहात केला आहे. यावर शासन सकारात्मक भुमिका घेईल अशी अपेक्षा आमदार बाबर यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *