आटपाडी ( प्रतिनिधी )
: शेळ्या – मेंढ्या, बोकडे – बकरे या लहान जनावरांसह , मोठ्या खिलार जनावरांचे पशुधन आणि आटपाडीचा शनिवारचा लहान जनावरांचा मुख्य बाजार ” ही आटपाडी तालुक्याची देशभरातील मुख्य ओळख बनावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी व्यक्त केले .
कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या वतीने, कुरेश कॉन्फरन्स नवी दिल्लीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सादिक खाटीक यांचा सभापती पै. संतोष पुजारी यांनी फेटा बांधून शाल पुष्पगुच्छ देत सन्मान केला . त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना सादिक खाटीक बोलत होते .
बाजार समितीचे संचालक सुनिल तळे, सचिव शशिकांत जाधव, युवा नेते विठ्ठलराव पुकळे, इंजिनीयर असिफ कलाल, असिफ उर्फ बाबु खाटीक, सलीम उर्फ बाळासाहेब वंजारी, रियाज शेख, अमीर खाटीक, इंजिनीयर असिम कलाल, रोमी शेख, सलमान शेख, इम्रान उर्फ गुंड्या शेख, सोमा जाधव माळी, पप्पू सरगर, रमेश माने, लखन तांबोळी इत्यादी अनेक जण यावेळी उपस्थित होते .
खाटीक म्हणाले, संपूर्ण माणदेश आणि आटपाडी तालुका उत्तम प्रकारच्या दुधाळ, कष्टाळू, कणखर, चपळ खिलार जनावरांसाठी, आणि उत्तम चवीच्या उत्कृष्ट प्रतिच्या बोकडे – बकऱ्यांच्या मांसासाठी भारतभर प्रसिद्ध प्रसिद्ध आहे . या बोकडा बकऱ्याच्या मांसाला आणि मोठया खिलार जनावरांना जी आय मानांकन मिळाल्यास या भागाला मोठे आर्थिक स्थैर्य प्राप्त होवू शकते . त्यासाठी मी प्रयत्नरत आहे . आटपाडीचा शनिवारचा लहान जनावरांचा आठवडा बाजार आणि माणदेशातला पशुपालनाचा व्यवसाय आटपाडी तालुक्याचे आर्थिक परिवर्तनाचे मुख्य मार्ग बनावेत एवढेच नव्हे तर राज्यात देश – परदेशातही हा बाजार आणि येथील पशुपालन सर्वतोमुखी व्हावे . बाजारांत सर्वकष सोयी सुविधांसह, सुरक्षितता देण्याबरोबरच मार्केट कमिटीने राज्यात अव्वल स्थानी पोहचावे असा आशावादही सादिक खाटीक यांनी व्यक्त केला .
आटपाडी तालुक्याचे युवा नेते तानाजीराव पाटील यांची दोन दशकातील वाटचाल राज्याने दखल घ्यावी अशी नेत्रदीपक ठरली आहे . त्यांच्या मार्गदर्शना खाली आणि सभापती संतोष पुजारी यांच्या नेतृत्वाखालील आटपाडीची मार्केट कमिटी नव नवीन उपक्रम राबविणारी राज्यातली अव्वल मार्केट कमेटी ठरेल . महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री, राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून या मार्केट कमिटी आणि येथील पशुपालनाशी निगडीत सर्व व्यवस्थेला भविष्यात मोठे पाठबळ मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . खाटीक बांधवांशी देशभर जोडल्या गेलेल्या संस्थेत मला राष्ट्रीय उपाध्यक्ष पद मिळाले. हा मी माझ्या भागाचा माझ्या माणदेशी बांधवांचा, समस्त खाटीक बांधवांचाच बहुमान असल्याचे समजतो असे ही शेवटी सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
आटपाडी तालुक्यातील पशुपालक शेतकरी व्यापारी विठ्ठलराव पुकळे यांनी प्रारंभी स्वागत करताना सादिक खाटीक यांच्या गत ४० वर्षाच्या खडतर वाटचालीचा आढावा घेतला. मार्केट कमेटीचे सचिव शशिकांत जाधव यांनी आभार मानले .