विट्यात सुमारे साडेतीन लाखांचे मोबाईल जप्त

: विटा पोलिसांची कामगिरी
विटा (प्रतिनिधी) : विटा शहर आणि परिसरात चोरीस गेलेले सुमारे 22 मोबाईल मोठ्या शिताफिने चोरट्यांकडून जप्त करण्यात आले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये इतकी आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विटा पोलीस ठाणे हददीत बाजारपेठा, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणाहुन नागरिकांचे मोबाईल गहाळ झालेबाबत विटा पोलीस ठाण्यात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. शहरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यामुळे भीतीचे वातावरण होते. पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबरे यांच्या माध्यमातून सुमारे 22 मोबाईल चोरीच्या घटनाचा योग्य तपास करून हे मोबाईल जप्त केले. या सर्व मोबाईलची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये असून सदरचे मोबाईल मालकांना परत देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक मेमाणे यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *