वाळवा (रहीम पठाण) : विद्यार्थी दशेत जर स्पर्धा परीक्षा विषय योग्य दिशा भेटली तर कमी वेळात सहज यशस्वी होता येते यासाठी विद्यार्थी व पालक यांनी स्पर्धा परीक्षेचा गाभा समजून घेणे गरजेचे असते, असे मत राजश्री शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधनी इस्लामपूर चे संस्थापक डॉ विक्रांत पाटील यांनी व्यक्त केले.
मसुचीवाडी येथे तुकाराम सावळा कदम विद्यालयातील इयत्ता दहावी सन 2000-2001 माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले स्पर्धा परीक्षा देताना सातत्य वेळेचे योग्य नियोजन खूप गरजेचे असते यावेळी इस्लामपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वरूटे म्हणाले ग्रामीण भागातील तरूणांनी स्पर्धा परीक्षांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.ती प्रेरणा देणारी आहे.तर पुढे इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.सतीश मिसाळ यांनी स्पर्धा परीक्षांचे टप्पे व त्यांचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन राहुल कदम यांनी केले तर प्रास्ताविक संदीप माने यांनी केले आभार सुधीर कदम यांनी मानले कार्यक्रमासाठी मा.शिक्षक श्री.भास्कर फाटक, श्री प्रकाश डुके, गावातील विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम
तुकाराम सावळा कदम विद्यालयातील इयत्ता दहावी मधील सन 2000-2001च्या विद्यार्थ्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते भविष्यात गावांमध्ये अनेक मोठे शासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी अशी शिबिरे वारंवार घेण्याचा मानस विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला.