मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण समिती कडेगांव तालुकाध्यक्षपदी दत्तूशेठ सूर्यवंशी.


कडेगांव /प्रतिनिधी.
: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. लाडकी बहिण योजना समितीच्या कडेगांव तालुकाध्यक्षपदी स्व. आमदार संपतराव (आण्णा) देशमुख यांचे सहकारी, सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ (आण्णा) सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ)खाडे यांनी अध्यक्ष सह शासकीय तीन सदस्यांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडून सुपूर्द केली आहेत.

राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. महिलांना प्रति महिना १५०० रुपये आर्थिक मदत देण्याच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे. तीन अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या मधून एकाची अध्यक्षपदी निवड करायची आहे. ही निवड पालकमंत्र्यांनी करण्याचा शासन निर्णय झालेला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीच्या कडेगांव तालुकाध्यक्षपदी दत्तुशेठ दादू सूर्यवंशी सदस्यपदी रजनीगंधा बापुराव पवार आणि दादासो पांडुरंग यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे सचिव तहसीलदार आहेत तर अन्य सदस्यांमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, बीडीओ, समाज कल्याण अधिकारी, सहा. प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, एक अंगणवाडी पर्यवेक्षिका, संरक्षण अधिकारी यांचा समावेश आहे.

पालकमंत्री यांनी निवड करताना सांगली जि. प. चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या शिफारशीने एकूण तीन अशासकीय सदस्यांना संधी दिली आहे. त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गतिमान होण्यासह त्याचा प्रचार, प्रसार करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, कडेगांव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री डॉ. सुरेश(भाऊ)खाडे, माजी आमदार पृथ्वीराज(बाबा) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली योजना प्रभावी राबविण्याचा प्रयत्न असेल, असे मदत दत्तूशेठ सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *