वाळवा ( प्रतिनिधी)
वाळवा, बोरगाव,मसुचीवाडी, ताकारी,जुनेखेड, नवेखेड,साटपेवाडी, गौंडवाडी,बनेवाडी परीसरात पावसांची संततधार सुरू आहे. सातत्याने पडणारे पाऊसामुळे नदी शेजारील गावांना सावधानता बाळगावी यासाठी प्रशासनाने खबरदारी सुरू केली आहे.
ताकारी येथे पुरस्थिती आढावा घेण्यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भेट देऊन माहीती घेतली यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलिस प्रमुख संदीप घुगे सांगली जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे व वाळवा तालुक्यातील प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते ताकरी येथील पुलाजवळ पाणी पातळी 43 फुटांच्या जवळ गेली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते
वाळवा पलूस तालुक्याला जोडणारा बंधारा प्रशासनाकडून बंद : साटपेवाडी येथील बंधारा प्रशासनाकडून खबरदारी म्हणून संध्याकाळी सहा वाजता बंद केला आहे.