वाळवा (रहीम पठाण) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 43 निवडणूक प्रभारी तर 93 विधानसभा निरीक्षकांची निवड जाहीर केली असून यामध्ये वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रभारी पदी हुतात्मा दुध संघाचे चेअरमन युवा नेते गौरव नायकवडी यांची निवड जाहीर केली आहे. या निवडीचे मतदार संघात फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्यावतीने 43 निवडणूक प्रभारी तर 93 विधानसभा निरीक्षकांची निवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जाहीर केली.
वाळवा इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात गौरव नायकवडी यांची निवडणूक निरीक्षक पदी निवड झाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते उमेदवार असू शकतात. या निवडीनंतर गौरव नायकवडी समर्थकानी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला.