सांगलीत महापुराच्या पाण्याला राजकारणाचा दुर्गंध; जोरदार तणाव

:’पृथ्वीराज बाबांच्या आरोग्य कॅम्पला विरोध
: आरोग्य कॅम्प लावण्यावरून ताणातानी
सांगली (प्रतिनिधी)- कृष्णा-वारणा नदीच्या पुराने बाधित लोकांच्या निवारा केंद्रात आरोग्य कॅम्प लावण्याच्या मुद्यावर महापालिका अधिकारी आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार ताणाताणी झाली. आरोग्य कॅम्पला मान्यता देण्याबाबत अधिकारी वेळकाढूपणा करत आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही मंडळींकडून दबावतंत्र वापरले जात आहे, असा आरोप फौंडेशनतर्फे करण्यात आला.

वीरेंद्र पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे आपली भूमिका आक्रमकपणे मांडली

या गंभीर स्थितीत सेवा कार्यात राजकीय अडथळे नकोत, अशी विनंती काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील यांनी केली. त्यानंतर कॅम्पला मान्यता देण्यात आली. विरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रवीकांत आडसुळ यांच्याशी चर्चा केली. दोन्ही अधिकाऱ्यांनी चर्चेतून मार्ग काढला.

गुलाबराव पाटील होमिओपॅथिक कॉलेज आणि पृथ्वीराज पाटील फौंडेशनतर्फे सुमारे चारशेहून अधिक लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पूरबाधितांना नियमित तपासणीसह मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार रुग्णांना विशेष सेवा देण्याची जबाबदार त्यांनी घेतली आहे. या कॅम्पबाबत महापालिका पातळीवर काही अडथळे येत असल्याने वातावरण ताणले. अधिकाऱ्यांनी खासगी कॅम्प नकोत, अशी भूमिका घेतली होती. यामागे राजकारण केले जात असल्याचा आरोप फौंडेशनतर्फे करण्यात आला.

कुणाचा दबाव आहे का?
आरोग्य सेवा या काळात महत्वाची आहे. कॅम्प कोणत्याही पक्षाचे असू देत, त्याला अडथळा आणू नका, अशी भूमिका फौंडेशनतर्फे अध्यक्ष बिपीन कदम यांनी घेतली. विरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना याबाबत माहिती देत आरोग्य सेवेत राजकारण नसावे, अशी विनंती केली. त्यांनीही सर्व सहकार्य केले जाईल, असा शब्द दिला. परंतू, आज सकाळी १७ नंबर शाळेत वाद उफाळून आला. आरोग्य सेवा द्या, मात्र फलक लावायचा नाही, असे काहींचे म्हणणे होते.

त्यावर वीरेंद्र पाटील यांनी ‘असे करण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? आमचा फलक लागला म्हणून कुणाचे नुकसान होणार आहे का? महापालिका या काळात लोकसेवा महत्वाची मानते की राजकारण? ज्यांनी दबाव टाकला आहे ते महापूर काळात कुठे आहेत? दुचाकीवरून फिरून मदत उभी राहत नाही, त्याला पुराच्या पाण्यात उतरावे लागते’, अशा शब्दांत उत्तर दिले.

महापालिकेची संपूर्ण यंत्रणा उत्तम काम करत आहे, त्यांनी राजकीय दबावाला बळू पडू नये, या काळात उभी राहणारी सर्व मदत महत्वाची आहे, अशी भूमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडली अखेर कॅम्पला परवानगी देण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन चे अध्यक्ष बिपिन कदम, माजी नगरसेवक तोफिक शिकलगार, करीमभाई मेस्त्री, निसार संगतरास, कुपवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनि धोतरे, टिपू बारगीर, सोहेल बलबंड, विश्वास माने, वसीम आमिन, आशिष चौधरी, सूर्यकांत लोंढे, बाबगोंडा पाटील, सलमान मेस्त्री, कैसे जमादार,  सरफराज शेख, नामदेव चव्हाण, अज्जू बेग, फाउंडेशनचे कार्यकर्ते व विविध संस्थेची पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *