शिवप्रतापचा रामोजी फिल्म सिटीत सन्मान; अभिनंदनाचा वर्षाव


विटा (प्रतिनिधी ): येथील प्रतिथयश शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा “राज्यस्तरीय  दिपस्तंभ पुरस्कार २०२४ ” हा पुरस्कार रु. 100 कोटीच्या वरील गटासाठी जाहीर  झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ३ ऑगस्ट रोजी रामोजी फिल्मसिटी , हैद्राबाद येथे मोठ्या दिमाखात होणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले.

साळुंखे म्हणाले, शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था ही  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असणारी व प्रामुख्याने सोने तारण कर्ज वितरण करणारी संस्था आहे. संस्थेच्या ठेवी ३३६ कोटी, गुंतवणूक ७४ कोटी, सोने तारण कर्जवाटप १६४ कोटी व इतर कर्ज वाटप १२९ कोटी, एकूण व्यवसाय ६२९ कोटी आहे. शिवप्रताप मल्टी स्टेट हि महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एक अग्रगण्यं संस्था असून या संस्थेला या अगोदरही २० वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेची स्थापना होऊन २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २२ वर्षात सुसज्य मुख्य कार्यालयासहित महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये २३ शाखांच्या माध्यमातून दोन लाखपेक्ष्या अधिक ग्राहकांना सेवा पुरवीत आहे.

संस्थेच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी मैत्रीण आर्थिक समृद्धी व्यासपीठाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे महिला उन्नती महिला बचत खात्याच्या माध्यमातून मोफत अपघाती विमा, मोफत वैद्यकीय खर्च आणि बचतीचे अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच त्याच्या उद्योगाला चालना देण्यासाठी विविध कर्ज योजनांची सुविधा देण्यात आली आहे. व्यावसायिकांसाठी UPI QR कोड ची सेवा सुरु करण्यात आली आहे. या पुरस्काराचे श्रेय सर्व सभासद, ग्राहक, कर्मचारी, पिग्मी एजंट व हितचिंतक यांचे असल्याचे संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले. यावेळी चेअरमन शेखर ( भाऊ) साळुंखे, व्हाईस चेअरमन हणमंतराव सपकाळ, सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *