विटा (प्रतिनिधी) : विटा शहर किराणा,भुसार व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी कांतीलाल जोगड व उपाध्यक्षपदी महेश देशमुखे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अध्यक्ष जोगड , उपाध्यक्ष देशमुख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विटा शहर किराणा व भुसार व्यापारी संघाची सभा आज मोहक सत्संग हॉल येथे पार पडली. संस्थापक अध्यक्ष श्री. पांडुरंग डोंबे अध्यक्षस्थानी होते. किराणा व भुसार संघाचे नुतन अध्यक्ष म्हणून श्री. कांतीलाल मोहनलाल जोगड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून श्री.महेश देशमुखे यांची निवड करण्यात आली. खजिनदार म्हणून श्री. महेश तारळेकर यांची निवड करण्यात आली. तसेच संचालक पदी श्री.पांडूरंग डोंबे, श्री. सिद्धेश्वर शेटे, श्री .राहुल पाटील, श्री .निलेश कोकीळ, श्री.सागर तारळेकर, श्री.जितुभाई शहा, श्री. सचिन शहा श्री.युवराज म्हेत्रे, श्री.तुषार मेहता श्री.सचिन टकले यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमास विटा व परिसरातील बहुसंख्य किराणा व भुसार व्यापारी उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष श्री डोंबे आबा यांनी सर्व व्यापाऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नूतन अध्यक्ष श्री कांताभाई जोगड यांनी भविष्यातील योजनांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अभय मणियार यांनी केले.