विटा (प्रतिनिधी) : खानापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघ स्वाभिमान भव्य रिल्स स्पर्धा 2024 चा बक्षीस वितरण समारंभ महाराष्ट्रातील ख्यातनाम व सुप्रसिद्ध रील स्टार अथर्व सुदामे यांच्या शुभहस्ते व युवक नेते सुहास बाबर यांच्या उपस्थितीत दिनांक 16 ऑगस्ट शुक्रवार रोजी जय मल्टीपर्पज हॉल येथे सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सध्या सोशल मीडियाचे जग आहे. यात सर्वाधिक रिल्स हा प्रकार लोकप्रिय होत चालला आहे. युवक नेते सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून खानापूर तालुक्यात प्रथमच अशा सकारात्मक, प्रबोधनात्मक रिल्सच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी परिसरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तरुणांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभागी दर्शवला आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता जय मल्टीपर्पज हॉल या ठिकाणी होणार आहे. यावेळेस रिल्स कशा बनवाव्यात, कशा प्रसिद्ध कराव्यात यासह बनवताना आलेले अनुभव व विनोदी किस्से सांगण्यासाठी ख्यातनाम रिल्स स्टार अथर्व सुदामे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख रुपये 40 हजार स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 30 हजार स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकाचे बक्षीस वीस हजार रुपये व सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र आणि चतुर्थ क्रमांकाचे उत्तेजनार्थ बक्षीस सन्मान चिन्ह व तसेच प्रशस्तीपत्र तर उत्तेजनार्थ बक्षीस पाच हजार रुपये सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे देण्यात येणार आहे. तसेच ज्या रील्सला सर्वाधिक लाईक्स प्राप्त झाले आहेत अशा रिल्सना रोख ७००० रुपये व ज्या रिल्सना सर्वाधिक व्ह्यूव्हर्स मिळाले आहेत त्यांना पाच हजार रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे.
यावेळी स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच विटा परिसरामध्ये अशा प्रकारच्या अनोख्या रील्स स्पर्धा प्रथमच होत असल्याने, उस्फूर्तपणे या स्पर्धांना प्रतिसाद मिळाला आहे. बक्षीस वितरणासाठी परिसरातून येणाऱ्या प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले आहे. लकी ड्रॉ द्वारे चिठ्ठी काढून प्रेक्षकांना देखील आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. यावेळी ज्या रील्स स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे त्यांच्या रील्स भव्य स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन खानापूर विधानसभा मतदारसंघ युवा सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.