आष्टा (डॉ तानाजी टकले ) : आनंद मिळवण्याच्या उद्देशाने शारीरिक मानसिक छळ, त्रासदायक कृत्य, अनुशासनहीन वर्तन यासारख्या बाबींचा रॅगिंग मध्ये समावेश होतो. रॅगिंगमुळे करियर उध्वस्त होते रॅगिंग हे अक्षम्य कृत्य गंभीर गुन्हा आहे. विद्यार्थ्यांनी मैत्रीची विणअधिक घट्ट करीत आपापसात ऋणानुबंध जपावेत, असे प्रतिपादन आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी केले.
येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग सप्ताह निमित्त आयोजित कार्येक्रमात श्री कटकधोंड बोलत होते. संस्थेचे सचिव एडवोकेट चिमण डांगे सहसचिव विश्वनाथ डांगे प्राचार्य डॉ अमित पेटकर, डॉ विजय डांगे अँटी रॅगिंग कमिटीचे कोऑर्डिनेटर डॉ दिलीप कटरे प्रमुख उपस्थित होते. अँटी रॅगिंग पोस्टर स्पर्धा, व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आल्या. अँटी रॅगिंग जनजागृती रॅली काढण्यात आली.
श्री कटकधोंड म्हणाले, रॅगिंग करणे हा कठोर गंभीर गुन्हा आहे. त्याचा प्रतिबंध झाला पाहिजे. महाविद्यालयीन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टर्सनी यशस्वी जीवनासाठी योगा आणि मेडिटेशन करणे आवश्यक आहे. त्यांनी रॅगिंग चे दुष्परिणाम त्यावरील उपाय योजना,कायदे, शिक्षा याविषयी माहिती दिली. डॉ दिलीप कटरे, म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. आण्णासाहेब डांगे ( आप्पा) यांची शिस्तप्रियता व नैतिक धाक सर्वश्रुत असल्याने या महाविद्यालयात रँगिंग सारखा गैर प्रकार होत नाही . रॅगिंग फ्री कॅम्पस हे आमचे ध्येय आहे. कार्यकारी संचालक डॉक्टर ए आर व्ही मूर्ती यांनी मार्गदर्शन केले.
डॉ प्रवीण ठोंबरे, डॉ दिपाली सावळे , डॉ सुरभी जंगटे यांनी विविध स्पर्धांचे नियोजन केले. या वेळी विशाखा कमिटी समन्वयक डॉ अलकनंदा कुलकर्णी, डॉ राधा फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले, डॉ गार्गी पाटील , डॉ अमृता सातव यांनी सूत्र संचालन केले , डॉ प्रांजली, डॉ मेघना, डॉ शीतल डॉ भाग्यश्री यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.डॉ टिंकू गणेश खलाचे यांनी आभार प्रदर्शन केले ,