वाळवा ( प्रतिनिधी ) : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यास एन. सी. डी. सी कडून 148.90 कोटी मार्जिन मनी लोन मंजुरीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात या कारखान्यास समृद्ध असे नवीन वैभव पाहायला मिळणार आहे.
राज्यातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्यामार्फत खेळत्या भांडवलासाठी राज्य शासनाच्या थकहमीवर कमी व्याजदराचे मार्जिन मणी मुदत कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
सदर कर्ज परतफेडीची मुदत आठ वर्षे असून त्यामध्ये दोन वर्ष विलंब कालावधी राहणार आहे. तसेच या मिळालेल्या कर्जाची मुदतीत कर्जफेड करणे ही महत्वाची जबाबदारी कारखान्यावर आहे आणि ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हे कर्ज उपलब्ध करण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांनी देशाचे गृह, सहकार मंत्री नाम. अमितभाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री नाम. दिलीप वळसे पाटील शासनाचे अधिकारी आणि एन. सी. डी. सी. चे मॅनेंजर डायरेक्ट पंकजकुमार बन्सल, डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री, पुणे विभागाचे रिजनल डायरेक्टर कर्नल विनीत नारायण, डे. डायरेक्टर गणेश गायकवाड व संबंधित अधिकारी यांचे आभार मानले .
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.