क्रांतिवीर नागनाथ अण्णांच्या    स्मारकासाठी मोठा निधी; वैभव नायकवडी यांची माहिती


वाळवा ( रहीम पठाण ) : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णाच्या स्मारकाच्या दुस-या टप्प्या करीता 1 कोटी 55 लाख 80 हजार इतका निधी मंजूर झाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांनी दिली.

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नियोजित स्मारकाच्या आराखड्याचे छायाचित्र

स्वातंत्र्य लढयातील अण्णांचे काम सदैव देशाला प्रेरणा देणारे आहे. यासाठी त्यांच्या कार्याचे स्मरण सदैव  रहावे, यासाठी महाराष्ट्र सरकारने स्मारक उभारणीचा निर्णय घेतला होता. त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पुढील काम पूर्तीसाठी निधी मंजूर केला आहे .

निधी मंजूरीचा शासन निर्णय दि.20 ऑगस्ट 2024 रोजी जारी करण्यात आला आहे. स्मारकाच्या दुस-या टप्प्यास निधी मंजूर केलेबद्दल चेअरमन वैभव नायकवडी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संबंधित शासकीय अधिकारी यांचे आभार मानले.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *