खानापूर तालुक्यात‌ अंगणवाडी मदतनीसांची भरती; पहा, भरतीची संपूर्ण प्रक्रिया..


सांगली,  (प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा प्रकल्पाअंतर्गत एकूण 13 महसूल गावातील 15 अंगणवाडी मदतनिस यांची रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ता धारक पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला अर्जदारांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज दि. 2 सप्टेंबर 2024 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

गाव व कंसात अंगणवाडी केंद्रनिहाय रिक्त् अंगणवाडी मदतनिस पदे पुढीलप्रमाणे – वाळुज (23) – 01, घानवड (20) – 01, रेवणगाव (24) – 01, बलवडी (खा) (7) – 01, कुर्ली (10) – 01, कार्वे (11) – 01, नागेवाडी (17) – 01, बानुरगड (1) – 01, पळशी (2) – 01, सुलतानगादे (3) – 01, भाळवणी (68, 14, 15) – 03, बलवडी (भा) (12) – 01, वाझर (13) – 01.

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे – अंगणवाडी मदतनिस पदासाठी सरळ नियुक्तीसाठी पात्र महिला उमेदवाराची वयोमर्यादा दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण व 35 वर्षाच्या आतील राहील. विधवा महिला उमेदवारासाठी ही वयोमर्यादा दि. 2 स्पटेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या महसुल गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. महसूल गावात एकापेक्षा जास्त पदे रिक्त असल्यास उमेदवारास एकाच ठिकाणी अर्ज करता येईल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *