विटा – मिरज रस्ता लवकरच खड्डे मुक्त;  सुहास बाबर यांची ग्वाही


विटा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गावरील विटा – मिरज या रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्यास दोन दिवसात सुरुवात होणार आहे. तसेच खड्डे बुजवण्याचे काम वेगाने पुर्ण करावे अशा सुचना सबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.‌ लवकरच हा रस्ता खड्डे मुक्त होईल, अशी ग्वाही युवक नेते सुहास बाबर यांनी दिली.

विटा : येथील विटा -तासगाव – मिरज या मार्गाची झालेली दयनीय अवस्था छायाचित्रात दिसत आहे.

मिरज – फलटण हा राष्ट्रीय महामार्ग खानापुर तालुक्यातून माहुली, नागेवाडी, घानवड, गार्डी, विटा, कार्वे तसेच तासगाव तालुक्यातील आळते, लिंब, शिरगाव, वंजारवाडी, तासगाव, कवठेएकंद, कुमठे फाटा यामागे म्हैसाळ ला जातो. या मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळा आहे व येणा- जाणाऱ्या वाहन धारकांना या खड्ड्यांचा प्रचंड त्रास होत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री के डी मुधाळे यांच्याशी संपर्क साधुन सदर खड्डे बुजविण्याचे काम तातडीने करावे अशी मागणी केली.        

यावर कार्यकारी अभियंता मुधाळे यांनी या मार्गावरील खड्डे चारच दिवसात खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात होईल असे सांगितले असल्याची माहिती बाबर यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *