आष्ट्यात संतप्त पडसाद; महायुती सरकारवर शिवप्रेमींचा हल्लाबोल


आष्टा (डॉ तानाजी टकले ) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेचा आज आष्टा शहरात निषेध करण्यात आला. मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला नसून महाराष्ट्राची अस्मिता कोसळली आहे. याला महायुती सरकार त्यांच्यातील ठेकेदारी, टक्केवारी कारणीभूत असल्याच्या भावना निषेध कर्त्यांनी व्यक्त केल्या. बस स्थानक परिसरातील बाळासाहेब ठाकरे चौकात जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, चैतन्य ढोले सावकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शिवाजी चोरमुले, समीर गायकवाड, झुंजारराव शिंदे, रघुनाथराव जाधव, सतीश माळी, रामचंद्र सिद्ध, महेश गायकवाड, शिवसेनेचे बंडा आटूगडे मुस्लिम समाजाचे नुयाजूल नायकवडी, प्रदीप ढोले, उदय कुशिरे, रंजीत पाटील, सतीश माळी, सूर्यकांत जुगदर विश्वराज शिंदे, बाबासाहेब सिद्ध, उदय कुशिरे,सुनील माने, महेश पाटील प्रमुख उपस्थित होते.

वैभव शिंदे म्हणाले, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभा केलेला पुतळा आठ महिन्यात पडणे ही दुर्दैवी घटना आहे.मुख्यमंत्री यांनी नौदल वाऱ्याच्या वेगाच स्पष्टीकरण दिलं असले तरी याला सर्वस्वी महायुती सरकारचा गलथानपणा, नाकर्तेपणा कारणीभूत आहे. कामातील ठेकेदार टक्केवारी कारणीभूत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मताच्या हव्यासापोटी महायुती सरकारने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन घेऊन घाई गडबडीत निकृष्ट दर्जाहीन  काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि खपवून घेणार नाही. या सरकारने लंडनहून महाराजांची आणलेली वाघनखे, हातात घेऊन महायुती सरकारचा कोथळा बाहेर पाडेल. विश्वराज शिंदे, महेश पाटील,सतीश माळी, उदय कुशीरे,स्नेहा माळी कुणाल काळोखे विशाल शिंदे विश्वराज शिंदे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *