सांगली ( प्रतिनिधी )
अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगलीच्यावतीने आयोजित पी. एन. जी. महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत इचलकरंजीच्या दत्ताजीराव कदम आर्टस सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजची ‘माई’ एकांकिका प्रथम आली तर आर. आय. टी. कॉलेज, इस्लामपूरची ‘व्हाय नॉट’ एकांकिका व्दितीय तर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअर्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, कोल्हापूर ची ‘पिंडदान’ एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन पीएनजी एकाकिंका स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्या संघाला अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार, पाच हजार रुपये मानचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत १७ संघ सहभागी झाले होते. तर नाट्य कलाकार, यासह सहकलाकारांसह २५० हून अधिक कलाकार सहभागी झाले होते. गेली दोन दिवस भावे नाट्य मंदिर कलाकारांनी भरले होते.
या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिके पुढील प्रमाण- दिग्दर्शन महेश गवंडी (माई), श्रेयस शिरीश (स्किम), अभिषेक पवार (व्हाय नॉट), स्त्री अभिनय-सुचिता तारळेकर (माई), पर्दा कारेकर (उंच माझा झोका ग), श्रावणी मारकड (पडदा), पुरीष अभिनय समर्थ तपकिरे (पिंडग्रान), सौमित्र कागलकर (व्हाय नॉट), ऋतिक रास्ते (फिर्याद), नेपथ्य सुमित गवंडी (इंद्रायणी), हर्षल कांबळे (पॉझिटीव्ह), करण परदेशी (बी अ मॅन), पार्श्वसंगीत प्रसाद पोतदार (यात्रा), साक्षी कांबळे (व्हाय नॉट), मानसी-गणेश-वासुदेव (पडदा), प्रकाश योजना आर्यन व्हनखेडे (उं माझा झोका ग), अभिषेक स्वामी (यात्रा), निरंजनपाटीलविवेक जाधव (यात्रा) यांनी मिळवली.
या स्पर्धेचा बक्षिस समारंभ पीएनजीचे संचालक राजीव गाडगीळ, मिलिंद गाडगीळ यांच्याहस्ते झाला. यावेळी नाट्य परिषद सांगली शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, श्रीनिवास जरंडीकर, कार्यवाह विशाल कुलकर्णी, अंजली भिडे, कुलदिप देवकुळे, शशांक लिमये, मकरंद कुलकर्णी, प्रशांत जगताप, मुकुंद पटवर्धन, चंद्रकांत धामणीकर, सनित कुलकर्णी, भालचंद्र चितळे, प्रशांत गोखले, अपर्णा गोसावी, सचिन पारेख आदी उपस्थित होते.