खा. अमोल कोल्हेंची तोफ विट्यात धडाडणार; वारं फिरणार असल्याची चर्चा

विटा ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खानापूर विधानसभा संघातील उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक खास. अमोल कोल्हे यांची जाहीर सभा सोमवार 11 रोजी विटा येथे होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

खानापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार म्हणून विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील मैदानात उतरले आहेत. सुरुवातीला महायुतीचे सुहास बाबर विरुद्ध महाविकास आघाडीचे वैभव पाटील अशी सरळ लढत होईल, अशी शक्यता होती. मात्र आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यामुळे मतदार संघात आणखी चुरस वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार वैभव पाटील यांना अत्यंत कमी वेळेतच मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते बाबासाहेब मुळीक यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून फोडाफोडीचे राजकारण आणि कोपर सभा या माध्यमातून वातावरण तापवण्याचे काम सुरू आहे.

विटा शहरात आज  विधानसभा मतदारसंघातील  पहिलीच मोठी सभा मायणी रस्त्यावरील आदर्श कॉलेज समोरील प्रांगणात दुपारी बारा वाजता होणार आहे.  वैभव पाटील यांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारक खास. अमोल कोल्हे मैदानात उतरणार असल्याने या सभेच्या माध्यमातूनच विटा शहरातील वारे फिरणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *