विटा ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्राने आमदारांचा बाजार बाजार पाहिला. तत्वासाठी आमदारकी, पद खुर्ची सोडणारे कुठे? आणि स्वार्थासाठी सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत येऊन शिवसेनेचे सरकार पाडून मिंधे सरकार आमदाराचा बाजार मांडून बनवणारे गद्दार कुठे ? गद्दारांचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळी पहिल्या पाच आमदारात आपले आमदार असतील, असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ धामणी, हातनूर आणि लेंगरे येथे जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब मुळीक होते.
पाटील पुढे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राची तत्वे भाजप महायुती सरकारने धुळीस मिळवली. पक्ष फोडीचा उच्छाद मांडला आहे. महाराष्ट्राच्या हिताचा एक ही निर्णय घेतला जात नाही. हजारो लोकांना काम मिळवून देणारे महाराष्ट्रातील 7 मोठे प्रकल्प गुजरातला नेले. राज्यावर 8 लाख कोटीचे कर्ज करून ठेवले आहे. राज्याच्या अर्थकारण बिघडून जाऊन राज्य दिवाळखोरीत निघेल. राजकारण इतक्या खालच्या पातळीवर आलेले आहे. संविधानिक भाषा वापरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. कोणाचा पायपुस कोणावर नाही असे सरकार आपल्याला बदलावे लागेल.
महागाईने उच्चांक गाठला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही. रासायनिक खतावर जीएसटी, महिला वरती अन्याय, अत्याचार होत आहेत.
यावेळी एडवोकेट बाबासाहेब मुळीक, प्रशांत सावंत, श्रीरंग शिंदे, शरद सुर्वे, विजय पाटील,विलास भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाला पोपट पाटील,जगन्नाथ पाटील, रमेश पाटील,सत्यवान कुलकर्णी, अर्जुन पाटील,दादासो पाटील, प्रकाश खुजट,विलास पाटील, मधुकर तात्या पाटील, पाटील तानाजी पाटील माजी सरपंच, विक्रम पाटील नसरुद्दीन मुल्ला,सुजित पाटील, हर्षवर्धन बागल, श्रीरंग शिंदे,सुरेश भाऊ चिंचणकर, आबासाहेब बागल, संजय गायकवाड, संपतराव गायकवाड, प्रकाश कदम, विठ्ठल कांडेसर, सुभाष गुजले, बाळासो कोल्हे, साहेबलाल शेख, हर्षल कोल्हे, रंगराव सावंत, शुभम बागल आदी मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.